बुद्धीमत्ता चाचणी

संख्या व संख्याचे प्रकार


  • समसंख्या – ज्या संख्येला २ ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला समसंख्या म्हणतात. समसंख्येच्या एककस्थानी ०,२,४,६,८, हे अंक येतात.
  • विषमसंख्या – ज्या संख्येला २ ने पूर्ण भाग जात नाही त्या संख्येला विषम संख्या म्हणतात. विषमसंख्येच्या एककस्थायी १,३,५,७,९ हे अंक येतात.
  • संख्याचे प्राथमिक क्रियाविषयक नियम :-
    1. समसंख्या + समसंख्या = समसंख्या
    2. समसंख्या - समसंख्या = समसंख्या
    3. समसंख्या + विषमसंख्या = विषमसंख्या
    4. समसंख्या - विषमसंख्या = विषमसंख्या
    5. विषमसंख्या - विषमसंख्या = समसंख्या
    6. विषमसंख्या + विषमसंख्या = समसंख्या
    7. समसंख्या X समसंख्या = समसंख्या
    8. समसंख्या X विषमसंख्या = समसंख्या
    9. विषमसंख्या X विषमसंख्या = विषमसंख्या
  • मूळसंख्या – ज्या संख्येस फक्त त्याच संख्येने किंवा १ नेच पूर्ण भाग जातो त्या संख्येला मूळसंख्या म्हणतात.
    उदा.- २, ३, ५, ७, ११, १३ इत्यादी.
    १ ते १०० संख्याच्या दरम्यान एकूण २५ मूळसंख्या आहेत त्या खाली दिल्या आहेत
    १ ते १०२, ३, ५, ७
    ११ ते २०११, १३, १७, १९
    २१ ते ३०२३, २९
    ३१ ते ४०३१, ३७
    ४१ ते ५०४१, ४३, ४७
    ५१ ते ६०५३, ५९
    ६१ ते ७०६१, ६७
    ७१ ते ८०७१, ७३, ७९
    ८१ ते ९०८३, ८९
    ९१ ते १००९७
  • जोडमूळ संख्या – ज्या दोन मूळसंख्यात केवळ २ चा फरक असतो अशा १ ते १०० मध्ये एकूण आठ जोडमूळ संख्याच्या जोड्या आहेत.
    उदा.- ३-५ , ५-७ , ११-१३ , १७-१९ , २९-३१ , ४१-४३ , ५९-६१ , ७१-७३
  • संयुक्त संख्या - मूळ संख्या नसलेल्या नैसर्गिक संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात.
    उदा.- ४, ६, ८, ९, १२ इ.
  • नैसर्गिक संख्या (मोजसंख्या)- १, २, ३, ४ ............... १ ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या असून नैसर्गिक संख्या अनंत आहेत.
  • पूर्ण संख्या – ०, १, २, ३, ४ ................ नैसर्गिक संख्यामध्ये ० मिळविल्यास पूर्ण संख्या मिळतात.
  • •पूर्णांक संख्या- ..........-३, -२, -१, ०, १, २, ३ ............................
  • परिमेय संख्या – [p/q - a≠0] p या पूर्णांकांला q या शुन्येत पूर्णांकाने भागले असता मिळणारी गुणोत्तरीय संख्या म्हणजे परिमेय संख्या.
    सर्व धन व ऋण पूर्णांक व अपूर्णांक संख्या ज्यांच्या छेद शुन्येतर आहे. अशा सर्व संख्या परिमेय संख्या असतात.
  • अपरिमेय संख्या – ज्या परिमेय संख्या नाहीत त्या अपरिमेय संख्या होत.
    उदा.- √(३ ) , √(२ ) इत्यादी
    या संख्याचे आवर्ती दशांशातही रुपांतर होत नाही.
  • परिमेय संख्या रुपांतर –
    नियम –
    1. धन (+) परिमेय संख्येची विरुद्ध संख्या ऋण (-) परिमेय संख्या असते व ऋण परिमेय संख्येची विरुद्ध संख्या धन परिमेय संख्या असते.
      उदा.- १) ४ ची विरुद्ध संख्या -४ , -३ ची विरुद्ध संख्या ३
      0 हा पूर्णांक धनही नाही व ऋणही नाही.
    2. कोणतीही परिमेय संख्या आणि ० यांचा गुणाकार ० येतो.
    3. कोणतीही परिमेय संख्या व १ यांचा गुणाकार अथवा भागाकार त्या संख्ये एवढाच येतो.
    4. गुणाकार व्यस्त –
      1. १ चा गुणाकार व्यस्त १ आहे
      2. २ चा गुणाकार व्यस्त १/२ आहे.
      3. ० ला गुणाकार व्यस्त नाही.
      4. ५ चा गुणाकार व्यस्त १/५
      5. 3 चा गुणाकार व्यस्त ५-३ अथवा (१/५)
      6. (२/३) चा गुणाकार व्यस्त (-२/३)-४ अथवा (३/२)
  • भागाकार – एका पुर्णांकास दुसऱ्या शुन्यतर पुर्णांकाने भागणे म्हणजे पहिल्या संख्येस दुसऱ्या संख्येचा गुणाकार व्यस्ताने गुणणे होय.
    उदा.- २५/७ ÷ ५/१२ = २५/७ X २१/५ = १५
  • संख्याविषयक महत्त्वाची प्राथमिक माहिती -
    1. अंकाची स्थानिक किंमत – संख्येतील कोणत्याही अंकाची स्थानिक किंमत काढताना त्या अंकापुढे जेवढे अंक असतील तेवढे शून्य त्या अंकापुढे येतात.
      उदा.- ४५१२३ या संख्येतील ५ ची स्थानिक किंमत ५००० तर २ ची स्थानिक किंमत २० होय.
    2. एक अंकी एकूण संख्या ९ आहेत तर दोन अंकी ९० , तीन अंकी ९०० आणि चार अंकी एकूण संख्या ९००० आहेत.
    3. लहानात लहान- एक अंकी संख्या १ आहे
      दोन अंकी संख्या १० आहे
      तीन अंकी संख्या १००
      या प्रमाणे ० वाढवीत जाणे
    4. मोठ्यात मोठी – एक अंकी संख्या ९
      दोन अंकी संख्या ९९
      तीन अंकी संख्या ९९९
      पुढे याचप्रमाणे ९ वाढवीत जाणे
    5. कोणत्याही संख्येला ० ने गुणले असता उत्तर ० येते.
    6. ० ते १०० पर्यंतच्या चा संख्यात
      अ) २ पासून ९ पर्यंतचे अंक प्रत्येकी २० वेळा येतात.
      आ) १ हा अंक २१ वेळा येतो.
      इ) ० हा अंक ११ वेळा येतो.
      १ ते १०० पर्यंतच्या संख्यात २ पासून ९ पर्यंतचे अंक असलेल्या एकूण संख्या प्रत्येकी १९ येतात. दोन अंकी संख्यात १ ते ९ या अंकाच्या प्रत्येकी १८ संख्या असतात.
    7. दोन अंक दिल्यास एकूण दोन संख्या तयार होतात. तीन अंक दिल्यास एकूण ६ संख्या तयार होतात. चार अंक दिल्यास २४ संख्या व पाच अंक दिल्यास एकूण १२० संख्या तयार होतात.
  • दोन संख्याची बेरीज –
    1. दोन अंकी २ संख्याची बेरीज १९ पेक्षा मोठी व १९९ पेक्षा लहान असते.
      कारण- १० + १० पेक्षा लहान असते.
    2. ३ अंकी २ संख्याची बेरीज १९९ पेक्षा मोठी व १९९९ पेक्षा लहान असते.
    3. ४ अंकी २ संख्याची बेरीज १९९९ पेक्षा मोठी व १९,९९९ पेक्षा लहान असते