आपला जिल्हा

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची माहिती

वाशीम जिल्हा

वाशीम जिल्हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. हा जिल्हा जुलै १ १९९८ रोजी स्थापन झाला. जिल्ह्याची लोकसंख्या १०,२०,२१६ इतकी आहे. वाशीम जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय वाशीम शहर आहे. ही वाकाटकांची राजधानी होती. वाशीम शहराचे प्राचीन नाव वत्सगुल्म आहे. जिल्ह्यातील मुख्य पिके- सोयाबीन, गहू, ज्वारी, बाजरी, तूर, कापूस ही आहेत.
राज्य:-                                                    महाराष्ट्र, भारत
विभागाचे नाव:-                                       अमरावती विभाग
मुख्यालय:-                                             वाशीम
तालुके:-                                                  कारंजा • मंगरुळपीर • मालेगाव • रिसोड • वाशीम तालुका • मानोरा
क्षेत्रफळ:-                                                ५,१५० कि.मी.²
लोकसंख्या:-                                           ११,९६,७१४ (२०११)
साक्षरता दर:-                                          ८१.७%
लिंग गुणोत्तर:-                                      १.०७ ♂/♀
लोकसभा मतदारसंघ:-                            यवतमाळ-वाशीम
विधानसभा मतदारसंघ:-                         कारंजा • रिसोड • वाशीम
खासदार:-                                              भावना पुंडलिकराव गवळी
पर्जन्यमान:-                                          ७५० मिमी

जिल्ह्यातील पर्यटनस्थळे- बालाजी मंदिर (वाशीम), श्रीक्षेत्र पोहरादेवी, पद्मतीर्थ शिवमंदिर, अंतरीक्ष पार्श्वनाथ जैन मंदिर, नृसिंह सरस्वती मंदिर (करंजा), सखाराम महाराज मंदिर (रिसोड), चामुंडा देवी.


वाशीम जिल्हाच्या पूर्वेस यवतमाळ, उत्तरेस अकोला, ईशान्येस अमरावती, पश्चिमेस बुलढाणा आणि दक्षिणेस हिंगोली हे जिल्हे आहेत. पैनगंगा ही जिल्ह्यातील मुख्य नदी आहे. कास ही तिची मुख्य उपनदी आहे. कास नदी पैनगंगेस शेलगाव राजगुरे या गावापासून १ किलोमीटरवर मिळते. अडाण नदी वाशीम तालुक्यात उगम पावते आणि मंगरुळपीर व मानोरा तालुक्यातून वाहते. वाशीम हे खांडवा-पूर्णा रेल्वेमार्गावरील एक स्थानक आहे.




अकोला जिल्हा

अकोला जिल्हा महाराष्ट्राच्या पूर्व भागात आहे.या जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र अकोला हे आहे.अकोला जिल्हा हा विदर्भाच्या अमरावती प्रशासकीय विभागात येतो. जुलै १, इ.स. १९९८ रोजी महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले. त्यामुळे अकोला व वाशीम हे दोन नवे जिल्हे निर्माण झाले.जिल्ह्याच्या सीमा उत्तरेस व पूर्वेस अमरावती जिल्हा, दक्षिणेस वाशीम जिल्हा तर पश्चिमेस बुलढाणा जिल्हा आहे.अकोला जिल्ह्याचे क्षेत्रफळ ५,४३१ चौ.कि.मी असून लोकसंख्या १६,३०,२३९ इतकी आहे.


विभागाचे नाव:-                      अमरावती
मुख्यालय:-                            अकोला
तालुके:-                                १.अकोट, २. अकोला,३. तेल्हारा,४.पातूर, ५.बार्शीटाकळी, ६.बाळापूर, ७.मूर्तिजापूर
क्षेत्रफळ:-                              ५४३१ कि.मी.²
लोकसंख्या:-                         १६,३०,२३९ (२००१)
लोकसंख्या घनता:-               ३००.८/किमी²
शहरी लोकसंख्या:-                ३८.४९
साक्षरता दर:-                       ८१.४१
लिंग गुणोत्तर:-                    ९३८ ♂/♀
जिल्हाधिकारी:-                    परिमल सिंग
लोकसभा मतदारसंघ:-         १.अकोला (लोकसभा मतदारसंघ)
विधानसभा मतदारसंघ:-      १.अकोला पूर्व,२.अकोला पश्चिम,३.अकोट, ४.बाळापूर, ५.मुर्तिजापूर
खासदार:-                            संजय धोत्रे
अकोला जिल्ह्यातील मुख्य नदी पूर्णा आहे. ही नदी जिल्ह्यात पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. पूर्णा नदीस शहानूर, पठार, विद्रूपा, आस, इत्यादी नद्या उत्तरेकडून येऊन मिळतात . उमा, काटेपूर्णा, मोर्णा व मन ह्या नद्या दक्षिणेकडून येऊन मिळतात. याशिवाय निर्गुणा ही मन नदीची उपनदी जिल्ह्यातून वाहते. वाशीम जिल्ह्यात काटेपूर्णा नदीचा उगम आहे. ही नदी बार्शीटाकळी, मूर्तिजापूर व अकोला या तालुक्यांतून वाहते. ती लाईत गावाजवळ पूर्णा नदीस मिळते. मूर्तिजापूर तालुक्यात सांगवी या ठिकाणाजवळ पूर्णा व उमा नद्यांचा संगम झाला आहे. मन व म्हैस या नद्यांचा संगम बाळापूर जवळ झाला आहे.  
अकोला जिल्ह्यात गाविलगड व अजिंठ्याच्या डॊंगरराळ भागात जास्त वने आहेत. वनात साग , ऐन, खैर, अंजन, इत्यादी वृक्ष आढळतात. तसेच मोर, रानकोंबडा, इत्यादी पक्षीही वनांत आहेत. पातूर तालुक्यात साग, चंदन, आढळते तसेच चारोळीचे उत्पादनही होते. जिल्ह्यात काटेपूर्णा अभयारण्य आहे.
मूग, तूर, तांदूळ, भुईमूग, उडीद, सोयाबीन आदी खरीप पिके जिल्ह्यात घेतली जातात.रब्बी हंगामात जिल्ह्यात प्रामुख्याने गहू, हरभरा, जवस, करडई, आदी पिके होतात. जिल्ह्यात बागायती शेतीसुद्धा थोड्याप्रमाणात होत असून त्यात मुख्यत: संत्री, मिरची, ऊस, केळी, पेरू, बोरे, पपई आणि टरबूज आदी पिके घेतली जातात. तेल्हारा व अकोट तालुक्यात विड्याच्या पानांचे उत्पादन होते.

जिल्ह्यात अकोला व मूर्तिजापूर ही दोन महत्त्वाची रेल्वे जंक्शने आहेत. जिल्ह्यातील लोहमार्ग मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात मोडतात.

  1. मुंबई - नागपूर - कोलकाता लोहमार्ग: हा लोहमार्ग जिल्ह्यातून पश्चिमेकडून पूर्वेस जातो. या मार्गावर पारस, अकोला, बोरगाव मंजू, काटेपूर्णा, मूर्तिजापूर आदी स्थानके आहेत.
  2. खांडवा - पूर्णा लोहमार्ग : हा लोहमार्ग जिल्ह्यातून उत्तर-दक्षिण गेला आहे. या मार्गावर अकोट, पाटसूळ, अकोला, बार्शीटाकळी इत्यादी स्थानके असून हा मार्ग पुढे वाशीमहून हिंगोलीमार्गे पूर्णाकडे जातो.
सध्या पुर्णा ते अकोला रेल्वेमार्ग ब्रॉडगेज झाला आहे. ग्यामार्गे अकोला-कुचीपूडी (हॅद्राबाद ) आणि नागपूर्-कोल्हापूर रेल्वे सुरु आहेत. अकोला-खण्डवा मार्ग अजुनही नॅरोगेज असून तो ब्रॉडगेज झाल्यास वर्हाड परीसराच्या विकासाला चालना मिळेल.

 अमरावती जिल्हा

इतिहास:-
  1. १८५३ च्या कराराद्वारे हैदराबादच्या निजामाने अमरावती जिल्ह्यासहित सर्व बेरार (वऱ्हाड) ईस्ट इंडिया कंपनीकडे काही काळाकरिता सुपूर्द केला.
  1. दक्षिण वऱ्हाड - त्याचे मुख्यालय हिंगोली येथे होते.
  1. पूर्व वऱ्हाड - उत्तर वऱ्हाडचे रूपांतर पूर्व वऱ्हाडात करण्यात आले. त्याचे मुख्यालय अकोला येथे होते.
  1. १८६४ मध्ये अमरावतीमधून यवतमाळ जिल्हा वेगळा करण्यात आला.
  1. १९०३ मध्ये निजामाने वऱ्हाड ब्रिटिश भारत सरकारकडे कायमस्वरूपी सुपूर्द केला.
  1. १९०३ मध्ये वऱ्हाड हा मध्यप्रांताला जोडण्यात आला, आणि मध्यप्रांत व बेरार असा मोठा प्रांत निर्माण करण्यात आला. तत्कालीन व्हाईसराय लॉर्ड कर्झन याने वऱ्हाड मुंबई प्रांतास जोडण्यास नकार दिला. मराठी भाषिकांमध्ये प्रांतिक फूट पाडणे हा त्याचा हेतू होता.
  1. १९५६ मधील राज्य पुनर्रचनेदरम्यान अमरावती जिल्ह्यासहित विदर्भातील सर्व जिल्हे तत्कालीन द्वैभाषिक मुंबई राज्यास जोडण्यात आले.
  1. १९६० मध्ये महाराष्ट्र व गुजरात वेगळे झाल्यावर अमरावती जिल्हा महाराष्ट्रातील एक जिल्हा बनला. अमरावती जिल्हा हा पूर्णपणे दख्खनच्या पठारावर आहे.
प्रशासकीय विभाग
  1. अमरावती - अमरावती तालुकाभातकुलीनांदगाव खंडेश्वर.
  1. दर्यापूर - दर्यापूरअंजनगाव सुर्जी.
  1. अचलपूर - अचलपूरचांदुर बाजार.
  1. मोर्शी- मोर्शीवरुड.
  1. धारणी - धारणीचिखलदरा.
  1. चांदुर(रेल्वे)- चांदुर रेल्वेधामणगांव रेल्वेतिवसा.
पर्यटनस्थळ
  • अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा हे प्रमुख पर्यटनस्थळ आहे. अमरावती शहरापासून ९० किमी अंतरावर हे ठिकाण समुद्रसपाटीपासून ३६हजार फूट उंचीवर सातपुड्याच्या कुशीत आहे. चिखलदऱ्याच्या परिसरात आठ प्रेक्षणीय स्थळे असून गाविलगडचा किल्ला , किचकदरा, आणि विराटराजाचा महाल इत्यादी मुख्य आकर्षणाची ठिकाणे आहेत. वैराट हे येथील सर्वात उंच ठिकाण आहे.
  • सालबर्डी हे पर्यटनस्थळ मोर्शीपासून ८ किमी अंतरावर आहे. येथे महादेवाचे जागृत ठिकाण आहे. येथील गरमपाण्याचे झरे हे एक प्रमुख आकर्षण आहे. संत मारुतीमहाराजांची समाधी आणि महानुभाव पंथाचे प्रसिद्ध मंदिर ही येथील काही ठळक आकर्षणे आहेत.
  • विदर्भाची प्राचीन राजधानी म्हणून कुंडीनपूर हे प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. दरवर्षी कार्तिक पौर्णिमेस येथे मोठी यात्रा भरते.
  • रिद्धपूर हे महानुभाव पंथीयांचे हे प्रमुख तीर्थस्थळ आहे.
  • अचलपूर तालुक्यातील बहिरम हे देवस्थान खूप प्रसिद्ध आहे.हे मंदिर सुमारे १२५ फूट उंचीवर आहे. चढण्यास १०८ पायऱ्या आहेत. येथे साडेसहा फूट उंच गणेशमूर्ती आहे.या मंदिरासमोर सहा टन वजनाची घंटा आहे. सातपुड्याच्या कुशीतील हे ठिकाण महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या सीमेवर आहे. येथे बहिरम (भैरव) या देवाची पूजा केली जाते. येथे दरवर्षी महिनाभर जत्रा चालते.ती यात्रा डिसेंबर महिन्यात सुरू होते. येथील मातीच्या हंडीत शिजवलेले मटण खास चवीचे म्हणून खवैय्यांमध्येत प्रसिद्ध आहे.
  • अमरावती जिल्ह्यातील महत्त्वाचे पीक कापूस हे आहे. पूर्णा, तापी व वर्धा या जिल्ह्यातील प्रमुख नद्या आहेत. वर्धा नदीवर सिंबोराजवळ जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण आहे. शहानूर नदीवर शहानूर प्रकल्प आहे. अमरावती शहराला वडाळी तलाव व छत्री या तलावांतून पाणी पुरवठा होतो.
  • अमरावती येथे रासायनिक खताचा कारखाना आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये रेगूर ही काळी मृदा मोठ्या प्रमाणात आहे. जिल्ह्यातील हवामान उष्ण व कोरडे आहे. १९४२ च्या चळवळीत या जिल्ह्याचे महत्त्वाचे योगदान आहे. ब्रिटिशांच्या दडपशाहीने जिल्हा हादरून गेला असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी खंजिरीवर थाप मारून जिल्ह्यातील तरुणांना राष्ट्रीय आंदोलनास प्रेरित केले. ..
  • चिखलदरा या ठिकाणाचे उल्लेख महाभारतात आढळतात. याच ठिकाणी भीमाने कीचकाचा वध करून त्याला दरीत फेकून दिले. त्यामुळे त्याला 'किचकदरा' असे नाव पडले, त्यावरूनच पुढे ते चिखलदरा झाले. महाराष्ट्रातील एकमेव कॉफी उत्पादक प्रदेश म्हणून चिखलदरा ओळखला जातो. आताशा येथे मध व स्ट्रॉबेरीचेसुद्धा उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतल्या जात आहे. मेळघाट हा जंगलव्याप्त परिसर अभयारण्य म्हणून घोषित केल्या गेला आहे. १९७२ला घोषित केल्या गेलेल्या देशातील १५ व्याघ्रप्रकल्पांतील हा एक. येथे १००हून अधिक वाघ आहेत. वाघांव्यतिरिक्त हा प्रदेश अस्वल, सांबर, रानडुक्कर, जंगली कुत्रे, मोर आदींसाठी प्रसिद्ध आहे.
  1. मेळघाट व्याघ्रप्रकल्प, कोलखास आणि सीमाडोह हे निसर्गरम्य स्थळे.
  1. गाविलगड किल्ला.
  1. नरनाळा किल्ला.
  1. पंडित नेहरू बॉटनिकल गार्डन
  1. ट्रायबल म्युझियम
शिक्षण:[संपादन]
  1. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती.
  1. V Y W S College of Engineering, Badnera, अमरावती
  1. सीपना अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती.
  1. P.R.Patil College of Engineering and technology Amravati,
  1. Dr. Sau. Kamaltai Gawai Institute of Engineering and Technology (KGIET), Darapur
  1. IBSS COLLEGE OF ENGINEERING, AMRAVATI,
  1. D E S's College of Engineering & Technology ,Dhamangaon Rly
  1. Shri H V P M's College of Engineering and Technology,Amravati.
  1. G H Raisoni College Of Engineering And Management , Amravati
  1. Indira Bahuuddeshiya Shikshan Sanstha, College of Engineering, Ghatkheda, Amravati
  1. डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति वैद्यकीय महाविद्यालय, अमरावती.
  1. विदर्भ आयुर्वेद महाविद्यालय, अमरावती.
  1. V.Y.W.S. दंतशल्यचिकित्सा महाविद्यालय, अमरावती.
  1. श्री वल्लभ तखतमल होमिओपॅथी महाविद्यालय, अमरावती.
  1. पंडित जवाहरलाल नेहरू मेमोरियल इन्स्टिट्यूट ऑफ होमियोपॅथिक मेडिकल सायन्सेस, अमरावती.

श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती.

शिक्षण सांख्यिकी

कंपनीने वऱ्हाड प्रांताचे दोन जिल्ह्यांमध्ये विभाजन केले -
विभागाचे नाव:-                      अमरावती
मुख्यालय:-                            अमरावती
तालुके:-                                १.चांदुर बाजार • चांदुर रेल्वे • चिखलदरा •अचलपूर • अंजनगाव सुर्जी • अमरावती                                                        तिवसा • धामणगांव रेल्वे •धारणी • दर्यापूर • नांदगाव खंडेश्वर •भातकुली • मोर्शी • वरुड,
क्षेत्रफळ:-                              १२,२३५ कि.मी.²
लोकसंख्या:-                         २८,८७,८२६ (२०११)
साक्षरता दर:-                       ८८.२३%
लिंग गुणोत्तर:-                    १.०५५ /
जिल्हाधिकारी:-                    श्रीमती रिचा बागला
लोकसभा मतदारसंघ:-         अमरावती
विधानसभा मतदारसंघ:-      अचलपूर • अमरावती • तिवसा • दर्यापूर• धामणगांव रेल्वे • बडनेरा • मेळघाट •मोर्शी
खासदार:-                            आनंदराव विठोबा अडसूळ

- जिल्ह्याचे विभाजन १४ तालुके आणि ६ उपविभागांमध्ये करण्यात आले आहे. त्यांचे विभाग पुढीलप्रमाणे आहेत.

प्राचीन इतिहासात अमरावती शहराचा उल्लेख महाभारतात आढळतो. महाभारत काळात श्रीकृष्णाने कौंडिण्यपूर या ठिकाणाहून रुक्मिणीचे हरण केले होते. श्रीकृष्णाने हरण करताना अमरावतीच्या एकवीरा देवीच्या तळाखालून ते कौडिण्यपूरपर्यंत भुयार खणले होते असे सांगतात.
अमरावती जिल्हा हा महाराष्ट्रातील उत्तरेकडील जिल्हा म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्र राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी ३.९८ टक्के क्षेत्र या जिल्हाने व्यापलेले आहे. अमरावती जिल्ह्यात कापसाची मोठी बाजारपेठ आहे. विदर्भातील महत्वाचा, शैक्षणिकदृष्ट्या प्रगतिशील जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. सामाजिक क्षेत्रामध्ये या जिल्ह्याचे नाव खूपच अग्रेसर आहे. संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गुलाबराव महाराज, डॉ. शिवाजीराव पटवर्धन, डॉ. पंजाबराव देशमुख इत्यादी महत्त्वाच्या व्यक्ती या जिल्ह्यात होऊन गेल्या आहेत.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी १९३५ साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. अमरावती जिल्ह्यातील सातपुड्याच्या कुशीत वसलेले चांदूरबाजार तहसिलातील माधान हे गाव श्री गुलाबराव महाराजांची कर्मभूमी आहे. १९४६ साली डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांनी कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी अमरावतीजवळ तपोवन येथे जगदंबा कुष्ठधामाची स्थापना केली. अमरावती येथील अंबादेवीचे मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख यांनी मंदिरप्रवेश चळवळ सुरू केली. १९३२ साली त्यांनी अमरावती येथे श्रद्धानंद छात्रालय व शिवाजी शिक्षण समितीची स्थापना केली. शिवाजी शिक्षण समिती आज विदर्भातील अग्रणी शिक्षण संस्था आहे. १८९७चे राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन अमरावती येथे भरले होते. या अधिवेशनाचे अध्यक्ष सी. शंकरन नायर हे होते.

विदर्भाच्या नकाशात जिल्ह्याचे स्थान
अमरावती जिल्ह्याला अकोला,यवतमाळवर्धा आणि वाशीम या जिल्ह्यांच्या सीमा लागल्या आहेत. अमरावती जिल्ह्याची सर्वात जास्त सीमा मध्यप्रदेश या राज्याला लागली आहे. अमरावती जिल्ह्यातील सातपुडा पर्वत हा मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राचा सीमावर्ती प्रदेश आहे. या जिल्ह्यातील वरूड आणि मोर्शी हे तालुके संत्र्यांसाठी प्रसिद्ध आहेत. भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेली शिवाजी शिक्षण संस्था विदर्भातील मोठी संस्था आहे. स्वातंत्र्याच्या आंदोलनात सहभागी होणारे दादासाहेब खापर्डे , वीर वामनराव जोशी याच जिल्ह्यातील होते.
अमरावती जिल्ह्यातील शेंदूरजना बाजार हे गाव गुरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे. याच गावी हिंद सेवक संघाची शाखा होती.
बहीरम यात्रा

चिखलदऱ्याजवळची काही आकर्षण केंद्रे :
अलीकडच्या काळात चिखलदरा हे ठिकाण पॅराग्लायडिंगसाठी हळूहळू उदयास येत आहे. भारतात पॅराग्लायडिंग मोजक्याच ठिकाणी होते. महाराष्ट्रातील हे तिसरे ठिकाण आहे.
जिल्ह्यात दहा अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत.

वैद्यकीय महाविद्यालये -
  1. ही शारीरिक शिक्षण क्षेत्रात जागतिक मान्यता असलेली संस्था म्हणजे अमरावतीचे भूषण आहे. जागतिक दर्जाच्या खेळ सुविधा येथे विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. येथे शारीरिक शिक्षणाचा पदवी अभ्यासक्रम चालवला जातो.
    प्राथमिक शाळा: १७७८ माध्यमिक शाळा: ३६४ महाविद्यालये : ३६ अध्यापक विद्यालये: ८ आदिवासी आश्रमशाळा: ३६ अभियांत्रिकी महाविद्यालये : १० तंत्रनिकेतन : ६ औद्योगिक प्रशिक्षण संस्था: २ वैद्यकीय महाविद्यालये: ५
  2. आरोग्य:

    जिल्हा सामान्य रुग्णालय: १ जिल्हा स्त्री रुग्णालय : १ जिल्हा क्षय रुग्णालय : १ प्राथमिक आरोग्य केंद्र : ५६ ग्रामीण कुटुंब केंद्र : १४

    पिके

    पिका खालील क्षेत्र : ८०१ हजार हेक्टर
    ओलीत क्षेत्र : ६२ हजार हेक्टर

    जलसिंचन :


    मोठे प्रकल्प - १ मध्यम प्रकल्प - २ लाभक्षेत्र : १६ हजार हेक्टर शेती पतसंस्था : ३८१


  3. बुलढाणा जिल्हा
  4. बुलढाणा जिल्हा (किंवा बुलडाणा जिल्हा) हा महाराष्ट्र राज्याच्या अमरावती विभागात आहे विदर्भातील या जिल्ह्याचे क्षेत्रफळ ९६८० चौ.किमी इतके असून लोकसंख्या २२,३२,४८० इतकी आहे. जिल्ह्याच्या पूर्व, पश्चिम व दक्षिण दिशेस अनुक्रमे अकोलाजळगाव जालना परभणी हे जिल्हे आहेत. तर उत्तरेस नेमाड जिल्हा(मध्य प्रदेश) आहे.[१]

  5. शेगांव येथील आनंदसागर बागेचे प्रवेशद्वार

    विदर्भाच्या नकाशात जिल्ह्याचे स्थान
    जिल्ह्याचे प्रशासकीय कार्यालय बुलढाणा शहरात असून ते १३ तालुक्यांशी राज्य महामार्गाशी जोडले गेले आहे. मुंबई ते हावडा हा महत्त्वाचा रेल्वे मार्ग तसेच पूर्व-पश्चिम भारतास जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ या जिल्ह्यातून गेला आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडील सर्व नद्या पश्चिम दिशेस वाहणाऱ्या आहेत व त्या तापी नदीला जाऊन मिळतात तर दक्षिणेकडील नद्या पैनगंगा नदीच्या उपनद्या आहेत. कापूस,ज्वारी, सोयाबीन, सूर्यफूल ही या जिल्ह्यातील महत्त्वाची पिके आहेत. जिल्ह्यात खामगाव, मलकापूर ही औद्योगिक शहरे आहेत.
  6. विभागाचे नाव:-                      अमरावती
  7. मुख्यालय:-                            बुलढाणा
    तालुके:-                       खामगांव • चिखली • संग्रामपूर •सिंदखेडराजा • देउळगांव राजा • नांदुरा •बुलढाणा तालुका • मेहकर • मोताळा •मलकापूर • लोणार • जळगाव जामोद •शेगांव
    क्षेत्रफळ:-                              ९६४० कि.मी.²
    लोकसंख्या:-                         २५,८८,०३९ (२०११)
    साक्षरता दर:-                       ८५%
    लिंग गुणोत्तर:-                    १.०१ /
    जिल्हाधिकारी:-                    श्री. बी जी वाघ
    लोकसभा मतदारसंघ:-         बुलढाणा (लोकसभा मतदारसंघ)

    खासदार:-                            प्रतापराव जाधव
  8. जिल्ह्यातील पर्यटनस्थळे


    • शेगाव येथे श्री संत गजानन महाराजाचे मंदिर व आनंदसागर हा प्रसिद्ध बगीचा आहे.
    • लोणार येथील उल्कापाताने निर्मिलेले खाऱ्या पाण्याचे सरोवर प्रसिद्ध आहे.
    • छत्रपती शिवजी राज्यांच्या मातोश्री जिजाबाई यांचे जन्मस्थान जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे आहे.
    • नांदुरा येथे जगातील सर्वात मोठी हनुमान मूर्ती आहे.
    • देऊळगाव राजा हे गाव तेथील बालाजीच्या मंदिरासाठी लोकांना माहीत असते.



यवतमाळ जिल्हा

इतिहास

ब्रिटिश राजवटीत यवतमाळ हा वणी जिल्ह्याचा प्रमुख विभाग होता. इ.स. १९०५ साली वणीचे यवतमाळ जिल्हा असे नामकरण करण्यात आले.
         उत्तर दिशा - वर्धा जिल्हा व अमरावती जिल्हा,
         पूर्व दिशा - चंद्रपूर जिल्हा,
         दक्षिण दिशा - आंध्र प्रदेश राज्य व नांदेड जिल्हा
         पश्चिम दिशा - हिंगोली जिल्हा व वाशीम जिल्हा आहे.
  • जिल्ह्यात वर्धा व पैनगंगा या प्रमुख नद्या आहेत. यवतमाळ जिल्हा हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा कापूस उत्पादक जिल्हा आहे. बालाघाट डोंगर रांगांपासून तयार झालेला हा जिल्हा डोंगराळ मध्यम पठाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात तापमान ४६° से. पर्यंत तर हिवाळ्यात ११° से. पर्यंत असते तर जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ९६५ मि.मी आहे. जिल्ह्याचा सुमारे २१ % भाग (२८५० चौ.कि.मी.) हा वनक्षेत्रात मोडतो
  • जिल्ह्याचे क्षेत्रफळ १३,५८४ चौ.कि.मी. आहे जे महाराष्ट्राच्या ४.४ % इतके आहे, तर लोकसंख्या २७,७५,४५७ (सन २०११) आहे. जिल्ह्यात अनेक जाती-जमातीचे लोक राहतात. कुणबीमाळीबंजाराआंधगोंडपरधान, आणि कोलाम या काही प्रमुख जमाती जिल्ह्यात वास्तव्यास आहेत. येथे मराठी बरोबरच बंजारी, कोलामी इत्यादी बोलीभाषा बोलल्या जातात..
  • जिल्ह्यात हातविणकाम(हँडलूम), विडी, कागद, साखर, जिनिंग-स्पिनिंग व तेल उद्योग असे अनेक छोटे-मोठे उद्योग आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील महत्त्वाची पिके- कापूसज्वारी,भुईमूगतूर-डाळ. जिल्ह्याला कापूस, लाकूड, चुनखडी, कोळसा व संत्री या वस्तूंद्वारे महसूल मिळतो. जिल्ह्यात विपुल प्रमाणात वनसंपत्ती आहे. तेथून लाकूड, बांबूतेंदू, आपटा, हिरडा वमोह या उपयोगी वस्तू मिळतात यवतमाळ, पुसदवणीदिग्रसघाटंजीपांढरकवडाराळेगाव,उमरखेडदारव्हा व नेर ही महत्त्वाची व्यापार केंद्रे आहेत.
  • जिल्ह्यातील पर्यटनस्थळे- घंटीबाबा जत्रा (दिग्रस), रंगनाथ स्वामी जत्रा (वणी), इतर जत्रेची ठिकाणे- कळंब, घाटंजी जवळच्या अंजी येथील नृसिंह मंदिर, वणी, तपोणा, पुसद, महागाव, कळंब येथील चिंतामणी मंदिर, रंगनाथ स्वामींचे मंदिर(वणी) इत्यादी.
  • या जिल्ह्यातील इसापूर येथे पैनगंगा नदीवर सर्वात मोठे घरण आहे. वनराई बंधारे या योजनेखाली २००५ ते २००८ या चार वर्षांत तब्बल २८,५५३ बंधारे बांधण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यात २००४ साली दुष्काळ होता. सुमारे सव्वाचार लाख हेक्टर क्षेत्रावरील पेरणी वाया गेली होती. नद्या, नाले, विहिरी, विंधनविहिरी कोरड्या झाल्या होत्या. जिल्ह्याची भूजलपातळी सरासरी १.९९ मीटरने खाली गेली. ९५ टक्के गावांमध्ये डिसेंबर अखेर पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली.
    गावभेटी तसेच, ग्रामस्थ-अधिकारी यांच्या चर्चेतून एक वास्तव समोर आले. ते म्हणजे जलसंधारणातील लोकसहभागाचा अभाव. त्याचबरोबर नैसर्गिक संकटावर मात करण्यासाठी केवळ शासनावर अवलंबून राहण्याची मानसिकता. २००५ मध्ये सुदैवाने चांगला पाऊस झाला. या अनुकूल परिस्थितीत जलसंधारण, त्याला लोकसहभागाची जोड, श्रमदान यासाठी विशेष उपक्रम घेणे आवश्यक होते. त्यासाठी सहजसोपे व विनाखर्ची वनराई बंधारे निर्मितीचे माध्यम निवडले. विविध विकासात्मक बांधकामातील पोती आणि विक्रेता संघ-कंत्राटदार संघटना यांनी दिलेली सिमेंटची रिकामी पोती त्यासाठी वापरण्यात आली.
    २००५ सालापासून पर्यावरण विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट झाला. त्यामुळे उपक्रमाच्या पहिल्या वर्षी ‘एक शाळा-एक वनराई बंधारा’ हा उपक्रम राबविण्यात आला. जिल्ह्य़ातील १८५९ प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी तब्बल २०४७ वनराई बंधारे बांधले. याची दखल घेऊन ‘युनिसेफ’ने हा वृत्तान्त आपल्या वेबसाइटवर प्रसिद्ध केला. त्यानंतरही विद्यार्थ्यांचा सहभाग कायम होता. सलग चार वर्षांत विद्यार्थ्यांनी एकूण ८,३३७ बंधारे बांधले. बंधारे बांधताना ते इतरांसाठी उपयुक्त ठरतील, याकडे विशेष लक्ष दिले. काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी थेट जंगलात जाऊन वन्यजीवांसाठी वनराई बंधार्‍यांची निर्मिती केली. तर काही ठिकाणी गावठाण परिसरातील सार्वजनिक विहिरींची पातळी वाढविण्यास साहाय्यक ठरतील, अशा ठिकाणी वनराई बंधारे बांधले गेले.
नागपूर जिल्हा
नागपूर जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ विभागात मोडतो. नागपूर जिल्हा हा भारताच्या जवळजवळ मध्यभागी स्थित असून भारताचा शून्य (0) मैलाचा दगड नागपूर शहरात आहे. या कारणामुळे देशातील महत्त्वाचे लोहमार्ग व महामार्ग जिल्ह्यातून जातात. नागपूर शहर हे महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आहे.
जिल्ह्यातील सरासरी पर्जन्यमान १,२०५ मी.मी. इतके आहे. जिल्ह्यातील मुख्य पीके-ऊसगहूसंत्रीज्वारीतूरमूगसोयाबीनसुर्यफूल,कापूस इ.
या जिल्ह्यात लघु सिंचन क्षमता खालील प्रकारे आहे: लघु सिंचन तलाव : १२३
  • पाझर तलाव : ५६
  • गाव तलाव : ३९
  • मालगुजारी तलाव : २१४
  • कोल्हापुरी बंधारे : ७२८
  • साठवण बंधारे : ८८८
जिल्ह्यातील पर्यटनस्थळे- दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस, कामठी, जादू महल, गंगावतरण पुतळा, भारताचा शून्य मैलाचा दगड,मध्यवर्ती संग्रहालय, नागपूर[२]
विभागाचे नाव:-                      नागपूर विभाग
मुख्यालय:-                            नागपूर
तालुके:-                               १.नागपूर शहर, २.नागपूर ग्रामीण, ३.सावनेर, ४.कळमेश्वर, ५.नरखेड, ६.काटोल, ७.पारशिवनी, ८.रामटेक, ९.हिंगणा, १०.मौदा, ११.कामठी, १२.उमरेड, १३.भिवापूर १४.कुही
क्षेत्रफळ:-                              ९,८९७ कि.मी.²
लोकसंख्या:-                         ४६,५३,१७१ (२०११
साक्षरता दर:-                       ८९.२५%
लिंग गुणोत्तर:-                    १.०५ /
जिल्हाधिकारी:-                    श्री. सौरभ राव
लोकसभा मतदारसंघ:-         नागपूररामटेक
विधानसभा मतदारसंघ:-     १.नागपूर उत्तर , २.नागपूर दक्षिण पश्चिम, ३. नागपूर दक्षिण, ४. नागपूर पश्चिम, ५.नागपूर पूर्व, ६.नागपूर मध्य, ७.उमरेड, ८.काटोल, ९.कामठी, १०.रामटेक, ११.सावनेर, १२.हिंगणा
खासदार:-                            विलास बाबूराव मुत्तेमवारमुकुल वासनिक
चंद्रपूर जिल्हा

चंद्रपूर जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागात आहे. चंद्रपूरला आधी 'चांदा' म्हणत असत. चंद्रपूर ही गोंड राजांची राजधानी होती व नंतर १७ व्या शतकात नागपूरच्या भोसले मराठ्यांनी चंद्रपूर ताब्यात घेतले. इ.स.१९८१ ला चंद्रपूर जिल्ह्यातून नवा गडचिरोली जिल्हा वेगळा बनवला गेला. चंद्रपूर जिल्ह्याला काळ्या सोन्याची भूमी म्हणतात कारण जिल्ह्यात अनेक कोळसा खाणी आहेत. चंद्रपूरात अनेक चुन्याच्या खाणीदेखिल आहेत.
विदर्भाच्या नकाशात जिल्ह्याचे स्थान
जिल्ह्याच्या उत्तरेस नागपूर जिल्हाभंडारा जिल्हा व वर्धा जिल्हा, पश्चिमेस यवतमाळ जिल्हा, पूर्वेस गडचिरोली जिल्हा, दक्षिणेसआदिलाबाद जिल्हा (आंध्र प्रदेश) आहे.हा जिल्हावैनगंगा व वर्धा नदीच्या पात्रांदरम्यान वसला आहे, ह्या त्या जिल्ह्याच्या पूर्व व पश्चिम सीमा बनतात.
तापमान किमान ७.१ ते कमाल ४७.२ से. च्या दरम्यान असते. पर्जन्यमान १३९८ मि. मी. इतके आहे. जिल्ह्याचे हवामान उष्ण असून मुख्यत: तीन ऋतु आहेत-उन्हाळा पावसाळा व हिवाळा. उन्हाळा मोठा व कडक असतो तर हिवाळा कमी कालावधीचा पण सौम्य असतो. मुख्य पीकेतांदूळ (खरिप), कापूससोयाबीनगहूतूरमूगउडीदमिरची ही आहेत्.
जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०,४९० चौ.कि.मी. आहे तर लोकसंख्या २०,७१,१०१ इतकी आहे. मराठीभाषेबरोबरच गोंडी, कोलामी व हिंदी भाषा या भाषादेखिल प्रचलीत आहेत.
महत्वाचे उद्योग- जिल्ह्यात बल्लारशहा कागद उद्योग, कोळसा खाणी, महाराष्ट्र राज्य औष्णिक विद्युतनिर्मिती व सिमेंट (अल्ट्राटेक, अंबुजा, माणिकगड व ए.सी.सी) हे महत्त्वाचे उद्योग आहेत. बाबा आमटेंचा आनंदवन आश्रम याच जिल्ह्यात आहे. ताडोबा व्याघ्रप्रकल्प हे या जिल्ह्याचे अजून एक वैशिष्ट्य आहे.
जिल्ह्यातील पर्यटनस्थळे- रामाळा व जुनोना तलावश्री महाकाली माता मंदीर (चंद्रपूर)घोडाझरी प्रकल्प, सातबहिणी तपोवन (नागभीड), अड्याळ टेकडी (ब्रम्हपुरी), रामदेगी (चिमूर) व ताडोबा अंधारी व्याघ्र अभयारण्य व राष्ट्रीय उद्यान प्रकल्प

भंडारा जिल्हा

भंडारा जिल्हा तळ्यांसाठी व सुगंधी तांदूळाच्या जातींसाठी प्रसिद्ध आहे. हा जिल्हा वनसंपत्ती व खनिजसंपत्तीत समृद्ध आहे. भंडारा शहर हे या जिल्ह्याचे मुख्यालय आहे.
जिल्ह्याची समुद्रसपाटीपासूनची सरासरी उंची २४४ मीटर(८०० फूट) आहे.


प्रेमपुर्वक याला 'तलावाचा जिल्हा' म्हटले जाते. भंडारा हा महाराष्ट्रातील जिल्हा  राज्याच्या ईशान्य भागात आहे, भंडाऱ्याची लोकसंख्या ११,९८,८१० आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ ३७१६.६५ चौरस किलोमीटर आहे.

भंडारा जिल्ह्याच्या उत्तरेस बालाघाट जिल्हा (मध्य प्रदेश), पूर्वेस गोंदिया, दक्षिणेस चंद्रपूर तर पश्चिमेस नागपूर जिल्हा आहे. उत्तरेकडे सातपुडा पर्वताचा डोंगराळ भाग आहे. भंडारा जिल्ह्याचे क्षेत्रफळ ३७१६ चौरस किमी असून एकूण लोकसंख्या ११,३५,८३५ इतकी आहे. [१]वैनगंगा ही जिल्ह्याची प्रमुख नदी आहे. भंडाऱ्यात ३,६४८ लहान लहान तळी आहेत. या जिल्ह्यात लोहखनिज विपुल प्रमाणात असून प्रमुख पीके पुढीलप्रमाणे- तांदूळगहू, मिलेट (एक तृणधान्य). भंडारा जिल्हा महाराष्ट्राचे तांदूळ आगार म्हणून प्रसिद्ध आहे. तांदळाच्या चिन्नोर, दुभराज, कालिकाम्मोड(?) या सुवासिक जाती प्रसिद्ध आहेत.
वैनगंगा ही या जिल्ह्यातील मुख्य नदी आहे. हिचा जिल्ह्यातील प्रवाह उन्हाळ्यातसुद्धा कोरडा पडत नाही. या जिल्ह्यात बावनथडी, चूलबंद, कन्हान, बाघ ही धरणे आहेत. भंडाऱ्यातील अर्थव्यवस्था मिश्र असून शेती आणि जंगले यांपासून मिळणाऱ्या उत्पन्नावर आधारित आहे. भंडारा हा महाराष्ट्रातला सर्वात जास्त प्रमाणात तांदुळ पिकविणारा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. नोर्गालिंग तिबेटन समझोता, हा तिबेटी समाज महाराष्ट्रमध्ये १९७२ पासून भंडारा जिल्ह्यात राहतो आहे. जवळपास १००० तिबेटी लोक नोर्गेलिंगमध्ये राहतात.
जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळे - अंबागड किल्ला, कोरांबी देवीचे मंदिर

                             गोंदिया जिल्हा


गोंदिया जिल्हाहा पूर्वी भंडारा जिल्ह्याचा एक भाग होता. गोंदिया जिल्हा महाराष्ट्राच्या ईशान्य दिशेला असून मध्य प्रदेश व छत्तीसगढ राज्यालगत आहे. गोंदियाचे क्षेत्रफळ ५,४३१ चौरस किलोमीटर, लोकसंख्या १२,००,१५१ असून साक्षरता ६७.६७% आहे,.

विदर्भाच्या नकाशात जिल्ह्याचे स्थान

गोंदिया हा तुलनेने मागासलेला जिल्हा आहे. व जिल्ह्याचा बराचसा भाग वनांनी व्यापलेला आहे. भात, ज्वारी, तेलबिया, गहू व तूर ही मुख्य पिके आहेत. वैनगंगा ही मुख्य नदी आहे. जिल्ह्यात अनेक भात सडण्याचे कारखाने (rice-mills) आहेत.

पर्यटनस्थळे: नागझिरा वने, प्रतापगड किल्ला, इतियाडोह धरण, नवेगाव राष्ट्रीय उद्यान[१] वगैरे.

जिल्ह्या्तील तालुके


  • अर्जुनी/मोरगाव,
  • आमगाव,
  • सडक/अर्जुनी,
  • सालेकसा,
  • गोंदिया तालुका,
  • गोरेगाव तालुका,
  • तिरोडा व
  • देवरी
गडचिरोली

गडचिरोली जिल्हा २६ ऑगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्यापासून वेगळा करण्यात आला. गडचिरोली, सिरोंचा हे चंद्रपूर जिल्ह्यामधील तालुके होते. गडचिरोली जिल्हा महाराष्ट्र राज्यात ईशान्य दिशेला असून आंध्र प्रदेश व छत्तीसगड राज्यांच्या सीमेलगत आहे. हा जिल्हा नक्षलग्रस्त आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ १४,४१४ चौ.कि.मी आहे.
हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ या प्रदेशात येतो.
फार प्राचीन काळी ह्या प्रदेशावर राष्ट्कूट यांचे राज्य होते. त्यानंतर चालुक्य वंशाचे व नंतर देवगिरीच्या यादवांचे राज्य आले. यानंतर गडचिरोलीवर गोंड राजांनी राज्य केले. तेराव्या शतकात, खंडक्या बल्लाळ शाह यांनी चंद्रपूरची स्थापना केली. त्यांनी आपली राजधानी सिरपूर येथून चंद्रपूर येथे हलविली. याच काळात चंद्रपूर प्रदेश हा मराठ्याच्या सत्तेखाली आला. १८५३ मध्ये, बेरार हा चंद्रपूर (पूर्वीचे चांदा) प्रदेशाचा भाग ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात आला. १८५४ मध्ये चंद्रपूर हा बेरार या प्रदेशामधला स्वतंत्र जिल्हा म्हणून अस्तित्वात आला. ब्रिटिशांनी १९०५ मध्ये चंद्रपूरमधील व ब्रह्मपुरीमधील जमीनदारी व मालमत्ता हस्तांतरण करून गडचिरोली तालुक्याची निर्मिती केली. राज्याची पुनर्रचना होण्यापूर्वी हा भाग १९५६ पर्यंत केंद्रीय अधिपत्याखाली होता. त्यानंतर राज्यपुनर्रचनेनुसार चंद्रपूर बॉम्बे स्टेटमध्ये समाविष्ट करण्यात आले. १९६०मध्ये महाराष्ट्र राज्य निर्माण झाले, त्यांत चंद्रपूर हा जिल्हा समाविष्ट झाला. १९८२ मध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून स्वतंत्र गडचिरोली जिल्हा अस्तित्वात आला
गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्र राज्यात ईशान्येला असून आंध्रप्रदेश व छत्तीसगड राज्याच्या सीमा त्याला लागून आहेत. हा जिल्हा नक्सल प्रभावित जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्हा जवळपास ७६ % जंगलाने व्यापलेला असल्याने घनदाट जंगलात नक्सल समर्थित लोक आश्रय घेतात.
पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत जाणाऱ्या गोदावरी नदीचे पात्र जिल्ह्याच्या सीमेला लागून असून तिच्या दक्षिणेला हा जिल्हा वसलेला आहे. प्राणहिता (वैनगंगा व वर्धा या नद्यांच्या संगमाने बनलेली नदी) व इंद्रावती ह्या गोदावरीच्या उपनद्या जिल्ह्याच्या सीमाभागात वाहतात.
विभागाचे नाव:-                      नागपूर विभाग
मुख्यालय:-                            गडचिरोली
तालुके:-                               अहेरीआरमोरीएटापल्लीकुरखेडा,कोरचीगडचिरोलीचामोर्शीदेसाईगंज (वडसा)धानोराभामरागड , मुलचेरा,सिरोंचा = एकूण १२
क्षेत्रफळ:-                              १४४१२ कि.मी.²
लोकसंख्या:-                         ९,७०,२९४ (२००१)
साक्षरता दर:-                      ६०.१ %
लिंग गुणोत्तर:-                    ९७६/ १००० /

जनता

जिल्ह्यात अनुसूचित जातीच्या लोकांची संख्या १,०८,८२४ एवढी असून तिची एकूण टक्केवारी ११.२ होते. आदिवासी जमातींच्या लोकांची संख्या ३,७१,६९६ एवढी असून त्यांचे प्रमाण जिल्ह्यात जास्त आहे. त्यांची टक्केवारी ३८.३० एवढी आहे. जिल्ह्यात एकूण लोकसंख्येपैकी ३८ टक्के लोकसंख्या ही अनुसूचित जमातीची असल्याने हा जिल्हा महाराष्ट्रातला आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. अनुसूचित जमातीमध्ये मुख्यत्वे गोंड, कोलाम, माडिया, परधान इत्यादी जमातीचे लोक आहेत. त्यांच्या बोलीभाषा "गोंडी, माडिया" ह्या आहेत. गडचिरोली जिल्ह्यामध्ये यांशिवाय मराठी, हिंदी, तेलुगू, बंगाली व छत्तीसगडी इत्यादी भाषा बोलल्या जातात.

लोकजीवन

जिल्ह्यातील आदिवासीची विशिष्ट अशी संस्कृती आहे. येथील आदिवासी लोकांचे "पेरसा पेन" हे दैवत आहे. ही लोक शुभकार्यप्रसंगी किवा पिकांचे उत्पादन झाल्यावर "रेला" नावाचे नृत्य करून आनंद व्यक्त करतात. " ढोल " हे सुद्धा त्यांचे आवडीचे नृत्य आहे. होळी, दसरा व दिवाळी हे त्यांचे मुख्य सण आहेत. आदिवासी जमात ही मुख्यतः जिल्ह्याच्या घनदाट जंगलात वास्तव्य करून आहे.
जिल्ह्यातील इतर जातीतील लोक त्यांचे गणपती, दसरा, दिवाळी, होळी इत्यादी सण साजरे करतात. जिल्ह्याच्या काही भागात झाडीपट्टीतील प्रसिद्ध "नाटक, तमाशा" इत्यादी मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे गणपती, दसरा, होळी या सणाचे वेळी तसेच शंकरपटाच्या निमित्ताने आयोजन होते.

व्यवसाय[संपादन]

हा जिल्हा बांबूची झाडे व तेंदूपानांकरिता प्रसिद्ध आहे. भात हे जिल्ह्याचे मुख्य पीक आहे. याव्यतिरिक्त तूर, गहू, ज्वारी, सोयाबीन, जवस इत्यादी कृषी उत्पादने घेतली जातात. जिल्ह्यातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे.

उद्योग[संपादन]

जिल्ह्यात चामोर्शी तालुक्यामध्ये आष्टी येथे पेपर मिल चा कारखाना असून इतर कोणतेही मोठे उद्योगधंदे नाहित. यामुळे, जिल्हा हा आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. जिल्ह्यात भाताचे उत्पादन जास्त होत असल्याने भात गिरण्यांची संख्या जास्त आहे. भातसडीचे उद्योग व कागद कारखाने जिल्ह्यात आहे पण मोठे उद्योग नाहीत. जिल्ह्यात कोसाचे उत्पादन होत असून कोसा उत्पादन केंद्र आरमोरी येथे आहे. जिल्ह्यात फक्त १८.५ कि.मी. लांबीचा रेल्वे मार्ग असून देसाईगंज येथे रेल्वेचे स्टेशन आहे.

प्रशासन[संपादन]

गडचिरोली जिल्ह्यामध्ये सहा प्रशासकीय उपविभाग (गडचिरोली, वडसा, अहेरी, चामोर्शी, एटापल्ली, कुरखेडा) आहेत. प्रत्येक उपविभागात दोन, असे एकूण १२ तालुके आहेत. जिल्ह्यात ४६७ ग्रामपंचायती असून १६८८ राजस्व गावे अस्तित्वात आहेत. जिल्ह्यामध्ये तीन विधानसभा व एक लोकसभा क्षेत्र (चंद्रपूर जिल्ह्याचा काही भाग मिळून) असून १२ पंचायत समित्या आहेत. जिल्ह्यात गडचिरोली व देसाईगंज ही दोन शहरे असून येथे नगरपालिका आहेत.

आकडेवारी[संपादन]

जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र :१४,४१२ चौ.कि.मी.
जिल्ह्याचे पृथ्वीवरील स्थान : १८.४३ ते २१.५० उत्तर अक्षांश आणि ७९.४५ ते ८०.५३ पूर्व रेखांश
समुद्रसपाटीपासून सरासरी उंची - २१७ मीटर (७१५ फूट )
जिल्ह्याचे तापमान (इ.स. १९९८) : सर्वात कमी ११.३ अंश सेल्शियस. सर्वात जास्त ४७.७ अंश सेल्शियस.
सरासरी पर्जन्यमान (२०११) : ८४०.७ मिलिमीटर
जिल्ह्यातील एकूण उपविभाग (६) १.गडचिरोली २. देसाईगंज (वडसा) ३. अहेरी ४. कुरखेडा ५. चामोर्शी ६. एटापल्ली
जिल्ह्यातील एकूण तालुके १२
जिल्ह्यातील एकूण गावे १,६७९
जिल्ह्यातील एकूण शहरे २ ( गडचिरोली, देसाईगंज)
जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायती ४६७
एकूण नगरपालिका (२) १. गडचिरोली २. देसाईगंज
लोकसभा निर्वाचन क्षेत्र (१) चिमूर-गडचिरोली
विधानसभा निर्वांचन क्षेत्रे (३) गडचिरोली, आरमोरी, अहेरी
एकूण पोलिस स्टेशन्स २९
पोलिस आऊट पोस्ट ३१
लोकसंख्या (२००१)
एकूण ९,७०,२९४
पैकी पुरुष ४,९१,१०१
आणि स्त्रिया ४,७९,१९३
लोकसंख्या घनता ६७ प्रति चौरस किलोमीटर स्त्रिया / पुरुष प्रमाण ९७६/ १०००
साक्षरता (इ.स. २००१ च्या खानेसुमारीप्रमाणे)
एकूण ६०.१ %
पुरुष ७१.९ %
स्त्रिया ४८.१ %

प्रेक्षणीय स्थळे[संपादन]

मार्कंडाचपराळाआलापल्लीवैरागड.
गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शी तालुक्यातील मार्कंडाचे ऐतिहासिक शिवमंदिर व चप्राळा येथील हनुमान मंदिर ही प्रसिद्ध मंदिरे आहेत.

आरोग्यसेवा[संपादन]

या जिल्ह्यात खालील प्रकारची आरोग्य सेवा उपलब्ध आहे-
  • जिल्हा रुग्णालय - १
  • एकूण ग्रामीण रुग्णालये - १३
  • एकूण प्राथमिक आरोग्य केंद्रे - ४५
  • प्राथमिक आरोग्य पथके - ३६
या समवेतच डॉ.अभय बंग व त्यांची पत्नी राणी बंग यांची सर्च (शोधग्राम, गडचिरोली) ही संस्था तेथील आदिवासींना आरोग्यसेवा पुरवते. डॉ.प्रकाश आमटे यांची लोक-बिरादरी (हेमलकसा,भामरागड) ही संस्थादेखील आदिवासींना सामाजिक व आरोग्यविषयक मदत करते.

हिंगोली जिल्हा

हिंगोली जिल्हा हा मराठवाडा विभागाच्या उत्तरेस आहे. हिंगोलीच्या उत्तरेस अकोला जिल्हा व यवतमाळ जिल्हा, पश्चिमेस परभणी जिल्हा, दक्षिण-पूर्वेस नांदेड जिल्हा आहे, आताचा हिंगोली जिल्हा परभणी जिल्ह्याचा एक भाग होता. हिंगोली १ मे १९९९ रोजी जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला. जिल्ह्यात औंढा, बसमत, हिंगोली, कळमनुरी व सेनगांव हे तालुके समाविष्ट आहेत.

हिंगोली जिल्ह्याचे क्षेत्रफळ ४५२६ कि.मी. आहे. एकूण लोकसंख्या ९,८७,१६० तर साक्षरता ६६.८६% इतकी आहे. गोंधळ, शाहिरी, भारुड, पोतराज व कळगीतुरा या लोककला जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत. ज्वारी व कापूस ही मुख्य पिके आहेत

विभागाचे नाव:-                      औरंगाबाद विभाग

मुख्यालय:-                            हिंगोली
तालुके:-                               औंढा नागनाथसेनगांवकळमनुरीबसमतहिंगोली
क्षेत्रफळ:-                              ४,५२६ कि.मी.²
लोकसंख्या:-                         ११,७८,९७३ (२०११)
साक्षरता दर:-                       ७६.०४%
लिंग गुणोत्तर:-                   १.०६ /
जिल्हाधिकारी:-                    श्री. एन. के. पोयाम
लोकसभा मतदारसंघ:-         हिंगोली (लोकसभा मतदारसंघ)
खासदार:-                           सुभाष वानखेडे

हिंगोली जिल्ह्यातील पर्यटनस्थळे:
  • औंढा नागनाथ- बारा ज्योतीर्लिंगांपैकी हे आठवे (आद्य) ज्योतीर्लिंग आहे.
  • इतर: मल्लिनाथ दिगंबर जैन मंदीर (शिरड शहापूर), तुळजादेवी संस्थान, संत नामदेवांचे जन्मस्थान (नरसी).शेवाळा येथील पुर्णानन्द् महाराजाचे मन्दिर्.
नांदेड जिल्हा
नांदेड जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील दक्षिण-पूर्वेस व आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्याच्या सीमेलगत आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा भागात असलेल्या नांदेड जिल्ह्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. नांदेडात शीखांचे शेवटचे गुरु गोविंदसिंहजी महाराज यांचा गुरुद्वारा आहे. नांदेड संतकवी विष्णूपंत व रघुनाथ आणि वामन पंडित यांचे जन्मस्थान आहे.नांदेड जिल्ह्यात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व श्री गुरुगोविंदसिंहजी अभियांत्रिकी व तांत्रिक महाविद्यालय या महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था आहेत.
नांदेड जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०,४२२ चौ.कि.मी आहे. जिल्ह्याची लोकसंख्या इ.स २००१च्या जनगणनेनुसार २८,७६,२५९ इतकी आहे. नांदेड जिल्ह्यात सरासरी पर्जन्यमान ९५३.८ मी.मी आहे. जिल्ह्यातील प्रमुख नद्या- गोदावरी, मांजरा, मान्याद व पेनगंगा.नांदेड हे नाव श्रीशंकराच्या नंदी या वाहनाच्या नावावरुन उगम पावले असल्याचे सांगण्यात येते.
विभागाचे नाव:-                      औरंगाबाद विभाग
मुख्यालय:-                             नांदेड
तालुके:-                               अर्धापूर • भोकर • बिलोली • देगलूर •धर्माबाद • हदगाव • हिमायतनगर •कंधार • किनवट • लोहा • माहूर •मुदखेड • मुखेड • नांदेड (तालुक्याचे ठिकाण) • नायगाव • उमरी
क्षेत्रफळ:-                              १०,४२२ कि.मी.²
लोकसंख्या:-                         ३३५६५६६ (२०११)
साक्षरता दर:-                       ७६.९४
लिंग गुणोत्तर:-                   १.०६ /
जिल्हाधिकारी:-                    श्री. श्रीकार परदेशी
लोकसभा मतदारसंघ:-         नांदेड (लोकसभा मतदारसंघ)हिंगोली (लोकसभा मतदारसंघ)(काही भाग)
खासदार:-                          भास्करराव पाटील (खतगावकर), सुभाष वानखेडे
नांदेड जिल्ह्यातील तालुकेअर्धापूरभोकरबिलोलीदेगलूरधर्माबादहदगाव,हिमायतनगरकंधारकिनवटलोहामाहूरमुदखेडमुखेडनांदेड (तालुक्याचे ठिकाण), नायगावउमरी
जिल्ह्यातील पर्यटनस्थळे- श्री गुरुगोविंदसिंह यांचा गुरुद्वारा, माहुरची रेणुकादेवी (शक्तिपीठ), बिलोली मशिद, कंधारचा किल्ला, लोहा तालुक्यातील माळेगाव यात्रा,देगलूर तालुक्यातील सिद्धेश्वर मंदीर (होट्ट्ल), नांदेडचा किल्ला व मुखेड येथील शिवमंदिर
                                                                  वर्धा जिल्हा
वर्धा जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे.
विभागाचे नाव:-                      नागपूर विभाग (पूर्व विदर्भ)
मुख्यालय:-                             वर्धा
तालुके:-                               १.आर्वी, २.आष्टी, ३.सेलू, ४.समुद्रपुर, ५.कारंजा, ६.देवळी, ७.वर्धा, ८.हिंगणघाट
क्षेत्रफळ:-                              ६३०९ कि.मी.²
लोकसंख्या:-                         १२,९६,१५७ (२०११)
साक्षरता दर:-                       ८७.२२%
लिंग गुणोत्तर:-                   १.०६ /
जिल्हाधिकारी:-                    श्री एन. नवीन सोना (२०१३)
लोकसभा मतदारसंघ:-         वर्धा
खासदार:-                          दत्ता मेघे

वर्धा जिल्हा हा चारही बाजूंनी महाराष्ट्रातीलच इतर चार जिल्ह्यांनी वेढलेला आहे. जिल्ह्याची कोणतीही सीमा दुसऱ्या राज्याला लागून नाही. पूर्व व उत्तरेस नागपूर जिल्हा, पश्चिमेस अमरावती जिल्हा आणि दक्षिणेस यवतमाळ जिल्हा व चंद्रपूर जिल्हाआहे. वर्धा नदी ही अमरावती जिल्हायवतमाळ जिल्हा व चंद्रपूर जिल्हा या जिल्ह्यांना वर्धा जिल्ह्यापासून वेगळे करते.

ठाणे जिल्हा






ठाणे जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे.

विभागाचे नाव:-                     कोकण विभाग

मुख्यालय:-                             ठाणे
तालुके:-                              १. ठाणे शहर (महापालिका क्षेत्र),२. वसई,३.कल्याण,४. मुरबाड,५. भिवंडी,६. शहापूर्,७.वाडा,८. जव्हार,९. मोखाडा,१०. पालघर,११.डहाणू,१२. तलासरी,१३. उल्हासनगर,१४.अंबरनाथ,१५. विक्रमगड
क्षेत्रफळ:-                              ९५५८ कि.मी.²
लोकसंख्या:-                         १,१०,५४,१३१ (२०११)
साक्षरता दर:-                       ८५%
जिल्हाधिकारी:-                    श्री एन. नवीन सोना (२०१३)
लोकसभा मतदारसंघ:-         वर्धा
खासदार:-                          संजीव नाईकसुरेश तावरेआनंद प्रकाश परांजपेबलिराम सुकुर जाधव

चतुःसीमा

  • पश्चिम- अरबी समुद्र
  • उत्तर- गुजरातवलसाड जिल्हा
  • पूर्व- अहमदनगर जिल्हानाशिक जिल्हा
  • दक्षिण- रायगड जिल्हामुंबई जिल्हा

मुंबई उपनगर जिल्हा

मुंबई उपनगर जिल्हा महाराष्ट्र राज्यातील दुसरा सर्वात लहान (क्षेत्रफळानुसार) जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र वांद्रे (पूर्व) येथे आहे. मुंबई शहर हे मुंबई जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा मिळून तयार होते. म्हंणजेच मुंबई उपनगर जिल्हा हा बृहन्मुंबई महापालिकेच्या प्रशासनाच्या अखत्यारीत येतो.मुंबई शहरातील (बृहन्मुंबई महानगरपालिका) १४ प्रभाग या जिल्ह्यात असून त्यांस पूर्व व पश्चिम उपनगरे असे संबोधले जाते.


तालुके


मुंबई उपनगर जिल्ह्यात कुर्ला तालुकाबोरीवली तालुका व अंधेरी तालुका हे तालुके असून लोकसंख्या ८५,८७,५६१ इतकी आहे. जिल्ह्यातील १००% लोकसंख्या नागरी आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ ३७० चौ.कि.मी आहे. हा जिल्हा महाराष्ट्रातील प्रगत जिल्ह्यांपैकी असून त्याचा या बाबतीत दुसरा क्रमांक लागतो. मिठी नदी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे.

पर्यटनस्थळे


जिल्ह्यातील पर्यटनस्थळे- जुहू बीच, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान,मार्वे व मानोरी बीच, कान्हेरी व जोगेश्वरी गुफा, एसेल वर्ल्ड, गोरेगांव चित्रनगरी, माऊंट मेरी चर्च, आरे कॉलनी, इ.

हे सुद्धा पहा

  • मुंबई (शहर)
  • मुंबई जिल्हा