द्रव्य (Matter)
व्याख्या:
" द्रव्य म्हणजे असे सर्व काही जे जागा व्यापते व ज्याला वस्तुमान असते "
"आपण द्रव पाहू शकतो, त्याची चव घेऊ शकतो, त्याचा वास घेऊ शकतो तसेच, स्पर्शाने त्याला अनुभवू शकतो. थोडक्यात, आपल्या ज्ञानेंद्रियांच्या साहाय्याने आपल्याला द्रव्याचे आकलन होते." द्रव्याला वस्तू किंवा पदार्थ असेही म्हणतात.